अतिमहत्वाचे: कोरोना विषाणूबाबत हे माहित असावेच.
इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कोरोना विषाणूबद्दलची माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
आजाराची सामान्य लक्षणे व
आजार टाळण्यासाठीचे सोपे उपाय येथे वाचा. (PDF)



बद्धकोष्ठ, मूळव्याध, भगंदर मोफत तपासणी शिबीर
(स्थळ: सहवास हॉस्पिटल; दिनांक: २४ नोव्हेंबर, रविवार)
अधिक माहितीसाठी क्लिक करा >>



• Blood Donation Camps
• Annual Health Checkup Camp in September
• Charity to needy patients
• Personalised Care
Facilities available
- Surgery
- Medicine
- Gynecology and Obstetrics
- Orthopaedics
- Psychiatry
- ENT (Ear Nose Throat)
- Ophthalmology
- Dermatology
- Urology
- Laboratory
- ECG
- Portable X ray
- Recognised Family Welfare Centre
About Sahawas Hospital
Working hours: 10.00 am to 1.00 pm | 6.00 pm to 8.00 pm.
Sahawas Hospital was established on September 5,1987 in Karvenagar area of Pune. Dr. Maya Tulpule is owner and founder of Sahawas Hospital.
Recent Events
दक्षिण आफ्रिका सहल
आपल्या आय. एम. ए. शाखेने आयोजित केलेल्या दक्षिण आफ्रिका सहलीत सहभागी होऊन ५० सहयोगी सभासदांबरोबर प्रवास आणि स्थळ दर्शनाचा आनंद लुटण्याचा योग आला. ह्या अनुषंगाने मनात आलेल्या आणि प्रकर्षाने जाणवलेल्या काही गोष्टी!
दक्षिण आफ्रिका म्हणजे सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो वास्को-द-गामा आणि केप टाऊन, नेल्सन मंडेला आणि त्यांचा प्रदीर्घ लढा, महात्मा गांधींनी डर्बन येथून सुरु केलेली असहकाराची चळवळ, क्रिकेट आणि फुटबॉल टीम्स, जोहान्सबर्गची सोन्याची खाण, किंबर्लेची रत्नाची खाण, विषुववृत्ताजवळची घनदाट जंगलं आणि वन्य प्राणी, जगातील पहिली हृदय शस्त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्चन बर्नाड, एच. आय. व्ही. / एड्स, क्षयरोग, कुपोषण आणि खूप काही! आफ्रिकेबद्दल खूपसं कुतूहल बाळगून आम्ही प्रवासाला सुरुवात केली.
केपटाऊनच्या टुमदार, अतिशय स्वच्छ विमानतळावर पाऊल ठेवल्यावर युरोपमधील छोटेखानी देशात आल्यासारखं वाटलं. सफाई कामगारांपासून ते हवाईसुंदरीपर्यंत सर्वच कृष्णवर्णीय, क्वचित एखादा गौरवर्णीय हाच काय तो फरक! रुंद रस्ते, ऐसपैस फुटपाथ, प्रशस्त चौक, मोठाली दुकाने, मॉल्स, बँका आणि ऑफिसेस! वाहतुकीचे नियम पाळणारी वाहने आणि माणसे, प्रदूषण विरहीत सुखद शीतल हवा! पाठीमागे पर्वत राजींचा पहारा, पुढे निळाशार समुद्र आणि स्वच्छ समुद्रकिनारे! हॉटेल्स भव्य, सुंदर, स्वच्छ! माणसं फारशी दिसायचीच नाहीत. कामगार वर्ग सगळा कृष्णवर्णीय, नाश्ता, जेवण साहेबी थाटाचे. गुजराथी, पंजाबी हॉटेल्स आहेत. चांगलं शाकाहारी जेवण मिळतं, पण तिथेही शेफ, वेटर्स कृष्णवर्णीयच!
निसर्ग साधनसंपत्तींनी अतिशय समृद्ध असा हा देश, ज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या अडीच पट आहे. सोने, रत्ने, कोळसा, लोखंड, युरेनियम मॅग्नेलाईट कोबाल्ट, टँटॅलम, मार्बल, सँडस्टोन इत्यादि खनिजांच्या खाणी आहेत.
पूर्वेस हिंदी महासागर आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. दक्षिणेस केप पॉईंट येथे हे दोन्ही एकमेकात मिसळून गेले आहेत. दोन हजार पाचशे किलोमीटरची लांबी असलेले समुद्रकिनारे आहेत.
लोकसंख्या ५.६ कोटी असून साधारणपणे ८० टक्के कृष्णवर्णीय, ९ टक्के गौरवर्णीय, ९ टक्के मिश्र आणि २ ते ३ टक्के आशियन आहेत. ८० टक्के ख्रिश्चन, १.७ टक्के मुस्लिम, १.१ टक्का हिंदू आणि १४.९ टक्के निधर्मी (Irreligion, कोणताही धर्म न मानणारे बहुतांश गोरे लोक) आहेत. इथे ११ अधिकृत भाषा आणि अनेक बोली भाषा आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स सर्वात अधिक वापरात असणारी भाषा आहे. त्याखालोखाल इंग्रजी भाषेचा क्रमांक लागतो. गंमत म्हणजे साऊथ आफ्रिकेला चार राजधान्या आहेत, कारण १९१० साली चार ब्रिटिश कॉलनीज एकत्र येऊन युनिअन ऑफ साऊथ आफ्रिका स्थापन झाली. प्रत्येक कॉलनीतले एक मोठे शहर राजधानी म्हणून जाहीर करण्यात आले आणि सरकारी ऑफिसेसची विभागणी करण्यात आली.
मुख्य राजधानी प्रिटोरिया येथून राज्यकारभार चालतो, केपटाऊन येथे विधानसभा भरते. संविधानिक, ब्लोमफौंटन येथे सुप्रीम कोर्ट आहे. जोहान्सबर्ग येथे सांविधानिक कोर्ट आहे. हे सर्वात मोठे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. मुंबईसारखेच गजबजलेले पण अतिशय स्वच्छ! बहुतांश साऊथ आफ्रिकन लोकांनी एकदा तरी जिवाची 'जोबर्ग' केलेली असते.
आफ्रिकेचा ३१ मे १९१० हा स्वातंत्र्य दिवस आहे आणि ३१ मे १९६१ हा प्रजासत्ताक दिन आहे. आफ्रिकन रँड किंवा ZAR हे चलन आहे, एका ZAR ची किंमत ५ रुपये आहे. सरासरी दरडोई दरमहा उत्पन्न तीन साडेतीन हजार रँड असे आहे. फुटबॉल हा सर्वात आवडता खेळ आहे. त्यानंतर क्रिकेटचा नंबर लागतो. गायन, वादन, नृत्य उपजतच त्यांच्या अंगात भिनलेले आहे.
दक्षिण आफ्रिकेने लोकशाही संसदीय प्रजासत्ताक राज्यपद्धती अवलंबिली आहे. राष्ट्रपतीला सर्वोच्च अधिकार बहाल केले आहेत. विद्यमान राष्ट्रपती सिरील रामफेसा हे आफ्रिकी नॅशनल काँग्रेसचे उमेदवार असून सर्वात श्रीमंत राजकारणी समजले जातात. यापूर्वीचे राष्ट्रपती जेकब जुमा यांना १५ फेब्रुवारी २०१८ रोजी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला होता. शरमेची गोष्ट अशी की त्यामागे अजय, अतुल आणि राजेश गुप्ता या भारतातील सहारनपूर येथून २४ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरीत झालेल्या उद्योगपती कुटुंबाचा मुख्य सहभाग होता.
वरवर पाहता प्रगतिशील दिसणारा हा देश शिक्षणाची कमतरता, गरिबी, दुष्काळ, एच. आय. व्ही. / एड्स, क्षयरोग, अंधश्रद्धा ह्यांनी ग्रासला आहे. तरुणांमध्ये ४० टक्के बेरोजगारी आहे. त्यामुळे अपहरण, लूटमार, खुनी हल्ले असे प्रकार सर्रास आढळतात. आम्हाला संध्याकाळी आणि रात्री एकेकटे हिंडू नका अशा सक्त सूचना होत्या. पत्र्यांच्या चार भिंती आणि वर त्याचेच छप्पर अशा झोपडपट्ट्या जोहान्सबर्ग येथे दिसल्या. वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर भ्रष्टाचार आणि लैंगिक अत्याचाराच्याच बातम्या वाचायला मिळाल्या. टीव्ही वर 'ब्लॅक इज ब्युटीफुल ', आम्हाला आमच्याच रंगाचा अभिमान आहे अशा सरकारी जाहिराती सतत झळकत असतात. १९५७ साली Witchcraft Supression Act अमलात आला आणि जादुटोणा करण्यावर किंवा वृद्ध स्त्रियांना चेटकीण समजून वाळीत टाकण्यावर बंदी आली. तरुण आफ्रिकन मुलींचे Female Genital Mutilation ही मोठी समस्या आहे.
अनेक बाबतीत दक्षिण आफ्रिका आणि भारत यात साम्य आढळते. परकीय लोकांची जुलमी राजवट, प्रदीर्घ स्वातंत्र्य चळवळ आणि शेवटी झगडून मिळालेले स्वातंत्र्य! शिक्षण, तंत्रज्ञान याबाबतीत आफ्रिका मागे राहिली, आपण पुढे गेलो परंतु आफ्रिकेत सत्ता कृष्णवर्णीयांच्या हातात आल्यावर देखील त्यांनी जपलेली स्वच्छता, सुंदर रस्ते, विकसित असलेल्या पर्यटन स्थळांची स्वच्छता, तेथील सोयीसुविधा आणि सुरक्षितता पाहून मन अचंबित होते. आपण यापासून काही बोध घेणार आहोत का ?
World Hypertension Day check up of Police personal, IMA and Sahawas Hospital initiative at Alankar Police Station.


Felicitation on Women's day 2017 at the hands of Comissioner of Police, Pune - Ms. Rashmi Shukla

Health check-up camp was organised at Panditrao Agashe school, Pune
